ग्राहकांसाठी घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा

    
|


बँकेने घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन याहीवर्षी केले आहे. या स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेकरीता ग्राहकाने स्वत:च्या घरात स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीचा व सजावटीचा फोटो दि. 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत www.dnsbank.in या बँकेच्या वेबसाईटवरील गणेशोत्सव 2022 (Announcements) या ठिकाणी अपलोड करावा. विजेत्यांना मान्यवर व्यक्तींच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व पारितोषिक देण्‍यात येणार आहे. स्पर्धेकरीताचे निकष खालीलप्रमाणे –

घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेकरीता असणारे निकष –

          स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी GMail Account चा वापर करावा.

  1. ही स्पर्धा फक्त बँकेच्या खातेधारकांसाठीच आयोजित केली आहे.
  2. स्पर्धकाचे खाते बँकेत असणे आवश्यक आहे.
  3. स्पर्धकांनी काढलेले फोटो हे कोणत्याही शाखेमध्ये स्वीकारले जाणार नाहीत.
  4. पर्यावरणस्नेही वस्तूंपासून केलेल्या सजावटीला तसेच मूर्तीला प्राधान्य दिले जाईल.
  5. सजावटीचा फोटो अपलोड करतांना जास्तीत जास्त 3 फोटो अपलोड करावेत व फॉर्ममध्ये असलेली सर्व माहिती देणे अत्यावश्यक आहे.