Newly Elected Hon. Board of Director

    
|

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. गणेश धारगळकर यांची निवड.


डोंबिवली- डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संप्पन्न झाली. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी १३ जणांचे नवनिर्वाचित संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. मा. निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक ( महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे) श्री. दिलीप उढाण यांनी दि. ५ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली.

मा. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या अध्यक्षतेत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा संप्पन्न झाली या सभेत, अॅड. श्री. गणेश धारगळकर यांची अध्यक्षपदी तर सौ. नंदिनी कुलकर्णी यांची उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.DNS BANK DIR_1   नवनिर्वाचित संचालक मंडळ

 


सर्वश्री सी.ए. जयंत पित्रे, महेश फणसे, मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर, जितेंद्र पटेल, लक्ष्मण खरपडे, योगेश चौधरी, सी.ए. विजय शेलार, सी.ए. अभिजित मराठे, सौ. पूर्वा पेंढरकर व अॅड सौ. मेघना आंबेकर हे सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत. या संचालक मंडळात ३ चार्टर्ड अकाउंटंट, २ अॅडव्होकेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील २ तज्ञ, बँकींगचा प्रदिर्घ अनुभव असलेले तसेच वास्तुरचनाकार, माध्यम सल्लागार व निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अशा विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे.