डोंबिवली बँकेकडून रा.स्व.संघ जनकल्याण समितीस कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान.

डोंबिवली बँकेकडून रा.स्व.संघ जनकल्याण समितीस कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान.

    
|


Donation of Ambulance _1&

डोंबिवली बँकेकडून रा.स्व.संघ जनकल्याण समितीस कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान.


डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आपल्या धर्मादाय निधीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीस सुसज्ज कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स नुकतीच सुपुर्द केली. यामुळे डोंबिवली आसपासच्या परिसरातील नागरीकांना वाजवी दरात कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे बँकेकडून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या 85 संस्थांना रु. 39 लाखांचा धर्मादाय निधीही वितरीत करण्यात आला.

याबरोबरच डोंबिवलीतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या ऑक्सिजन बेडस् ची कमतरता लक्षात घेऊन बँकेने दोन ऑक्सिजन मशिन्स डोंबिवली येथील अनिता रूग्ण सेवा केंद्रास वापरण्यासाठी दिली आहेत.

बँकेच्या भागधारक कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात येणारा ``समाजमित्र पुरस्कार’’ ह्यावर्षी पनवेल येथील आदिवासी समाजातील कर्णबधिर मतिमंद मुलांसाठी काम करणा-या ``रामचंद्र कुरूळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था’’ यांना देण्यात आला. पुरस्कार रकमेचा धनादेश, मानपत्र बँकेचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय तसेच नाविन्यपूर्ण काम करणा-या संस्थेस अथवा कार्यकर्त्यास प्रतिवर्षी ``सहकार मित्र पुरस्कार’’ देण्यात येतो. ह्यावर्षीचा सहकार मित्र पुरस्कार ``अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी संघ’’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. पुरस्कार रकमेचा धनादेश, मानपत्र बँकेचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




-@@@@@-