डोंबिवली बँकेच्या सभासदांना 9% लाभांश

09 Nov 2021 11:48:38

डोंबिवली बँकेच्या सभासदांना 9% लाभांश

डोंबिवली - डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्याप्रमाणे व रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीनंतर आर्थिक वर्ष 2020-2021 चा 9% लाभांश बँकेच्या सर्व साधारण सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना 9.25% दराने लाभांश अदा करण्यात आला आहे. याबद्दल अनेक सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Vehicle Loan _1 &nbs
सणासुदीच्या दिवसांत बँकेने वाहन कर्जावरील व्याजदर 0.25% ने कमी केले आहेत. प्रदुषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांकरीता व्याजदर 7.50% आकारण्यात येणार आहे. वाहन कर्ज योजनेमध्ये 100 % कर्ज उपलब्ध होणार असून ग्राहकांना कर्जावरील प्रक्रिया शुल्कही अदा करावे लागणार नाहीत. ही योजना दि. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत सुरू आहे. तरी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Vehicle Loan _1 &nbs 

बँकेने ग्राहकांसाठी फास्ट टॅग सुविधा सुरू केली आहे. आपल्या बँकेच्या फास्ट टॅगचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्राहकाच्या स्वत:च्या खात्यामधून टोलची रक्कम थेट वळती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवास करताना फास्ट टॅग रिचार्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही व चिंतामुक्त प्रवास करणे सुलभ होणार आहे. तरी ग्राहकांनी फास्ट टॅग मिळविण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

0-0-0-0-0-0-0-0

Powered By Sangraha 9.0