'डोंबिवली नागरी सहकारी बँके'तर्फे महिला मेळाव्याचे आयोजन

    
                                                            'डोंबिवली नागरी सहकारी बँके'तर्फे महिला मेळाव्याचे आयोजन
  डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार ,दि. ८ मार्च २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता , सुयोग मंगल कार्यालय, टिळक रोड, डोंबिवली पूर्व येथे होणार असून याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्यात्या मा. कांचन दीक्षित या, 'वेळेचे व्यवस्थापन' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनोखे कार्य करणाऱ्या ६ महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे.
                  कार्यक्षमता वाढवून आपले जीवन अधिक आनंदी करणाऱ्या या लोकप्रिय कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

Dombivli Women's Day Even