डोंबिवली बँकेने केला अनोख्या क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा सन्मान.

    

                                                         डोंबिवली बँकेने केला अनोख्या क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा सन्मान.

डोंबिवली- जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली नागरी सहकारी बँकेने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात, अनोख्या क्षेत्रात काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला. डोंबिवली ते अमृतसर हे १९०० कि.मी. चं अंतर १७ दिवसांत सायकलने पार करणा-या नयना आघारकर व मीरा वैद्य, रिक्षा चालवून अर्थार्जन करणा-या अनिता भूजबळ व आरती पवार, बुलेट मोटरसायकलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणा-या स्वाती कांबळे तसेच महिला वैमानिक म्हणून इंडिगो सारख्या नामांकीत कंपनीत नव्याने रूजू झालेल्या अनुश्री कुलकर्णी यांचा भेटवस्तू व अभिनंदन पत्र देउन सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात, पुणे येथील सुप्रसिध्द व्याख्यात्या कांचन दिक्षित यांनी वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. गृहिणी, व्यवसायिक, नोकरदार महिलांना, दैनंदिन कामकाजात तसेच आरोग्यास उपयुक्त ठरतील अशा टिपस् त्यांनी याप्रसंगी सांगितल्या.

प्रारंभी बँकेच्या मा. उपाध्यक्षा नंदिनी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी बँकेविषयी थोडक्यात माहिती सांगितली व महिलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने समाजात वावरले पाहिजे असे आवर्जून सांगितले. सहसरव्यवस्थापक सुनिता शशांकन यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. मा. संचालिका मेघना आंबेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Women's Day Event_1 
Women's Day Event_1 
 
 

Women's Day Event_1  
Women's Day Event_1 


Women's Day Event_1 
Women's Day Event_1