इचलकरंजी शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

    
|


 
img1_1  H x W:

img2_1  H x W:  
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेचा ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या उदंड उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री पेंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी बँकेची स्थापनेपासूनची माहिती दिली.
 
 मा. संचालक योगेश वाळुंजकर यांनी बँकेच्या IT संबंधित सुरक्षेबद्दल माहिती दिली. तदनंतर सहा. सरव्यवस्थापक श्री. पराग नवरे यांनी बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी सहकारी बँकांची परिस्थिती व देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सहकारातील घडामोडींचा उहापोह केला.
 
 
img3_1  H x W:
 
img4_1  H x W:
 
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित ग्राहक, सभासद यांनी कामकाजासंबंधी सूचना मांडल्या व त्यांना मा अध्यक्ष यांनी समर्पक उत्तरे दिली व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.