घाटकोपर शाखा मेळावा संपन्न

    
|
 
ght1_1  H x W:

ght2_1  H x W:  
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेचा मेळावा ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. मेळाव्याचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने झाला तसेच सुरुवातीला कॉर्पोरेट व नवीन सोसायटी अॅपची फिल्म दाखविण्यात आली. मा. संचालक श्री. जयंत पित्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मा. संचालक श्री. योगेश वाळुंजकर यांनी सायबर सिक्युरीटी व अद्ययावत तंत्रज्ञान यावर माहिती दिली. सहाय्यक सरव्यवस्थापक सौ. सुनिता पाटील यांनी ठेवी व कर्जे तसेच विविध विमा योजना यांचीही माहिती दिली.
 
 
ght3_1  H x W:
 
ght4_1  H x W:
सरव्यवस्थापक श्री. गोपाळ परांजपे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत तसेच सहकारी बँकींग क्षेत्राबद्दल माहिती सांगितली. सौ. रश्मी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास चांगल्या संख्येने सभासद व ग्राहक उपस्थित होते