डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खोपोली शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. उपाध्यक्षा कुलकर्णी मॅडम, मा. संचालक सर्वश्री फणसे व वाळूंजकर यांनी मेळाव्यास संबोधन केले. प्रारंभी मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी बँकेचा १९७० पासूनच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. मा. उपाध्यक्षा कुलकर्णी मॅडम यांनी बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. मा. संचालक श्री.वाळूंजकर यांनी IT आणि सायबर सिक्युरिटी विषयी माहिती दिली. सहा.सरव्यवस्थापक श्री. पराग नवरे यांनी ठेवी व कर्ज योजनांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन श्री. उदय पेंडसे यांनी केले. मेळाव्यास सभासद-ग्राहक चांगल्या संख्येने उपस्थित होते.