अंबरनाथ शाखा सभासद मेळावा संपन्न

    

dn_1  H x W: 0  
 

dn_1  H x W: 0  
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अंबरनाथ शाखेचा सभासद मेळावा शनिवार दि. ०८.०२.२०२० रोजी सायंकाळी संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात उपस्थितांचे स्वागत आणि दीप प्रज्वलन करून झाली. सुरवातीला बँके बद्दलची माहिती तसेच बँकेत चालणारे कामकाज याबद्दलची माहिती मा. संचालक श्री. कोपरकर साहेब यांनी दिली, त्यात बँकेची स्थापना, शाखा विस्तार, बँकेची उन्नत्ती याचा अद्ययावत आढावा घेतला.
 
dddddd_2  H x W
 
तसेच बँकेच्या दैनंदिन कारभार याबरोबरच सामाजिक आशयाचे भान ठेवून बँकेने जे विविध उपक्रम हाती घेतले आहेत याची माहिती उपस्थितांना दिली.
 

dddddd_1  H x W

dddddd_3  H x W 
 
मा. संचालक श्री.फणसे साहेब यांनी बँकेच्या ग्राहक सेवे विषयी माहिती दिली, त्यात त्यांनी ग्राहक सेवा, समाजाप्रती संवेदनशीलता या त्रिसूत्रीचा उल्लेख केला. आपली बँक अद्ययावत IT तंत्रज्ञानाची कास धरीत आहे असे सांगितले. मोबाइल बँकिंग सेवा देणारी पहिली सहकारी बँक, रूपे डेबिट कार्ड तसेच जागतिक दर्जाचे कोअर बँकिंग सॉफ्टवेअर बँकेने ग्राहकांना उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. हाउसिंग सोसायटी अँप BBPS सेवा याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ शाखेचे पालक अधिकारी श्री. जुवळे साहेब यांनी बँकेच्या विविध ठेवी, कर्ज, विमा योजना, पेन्शन योजना, तंत्रज्ञान सेवा याबद्दलची माहिती आपल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना दिली.
 

dddddd_4  H x W 
 
बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. कर्वे साहेब यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीसच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले व उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. सहकारी बँकांचा पूर्वइतिहास त्यांची जडण घडण व आपल्या बँकेचा स्थापनेपासूनचा मागोवा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. आपल्या बँकेची विशिष्ट शिस्तप्रिय कार्यपद्धती ग्राहकांनप्रति सेवाभाव हे आपल्या सेवेचे वैशिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात ठेवी, कर्ज, कर्जाची वसुली, NPA खात्यांची वसुली याविषयी त्यांनी माहिती दिली. बँकेचे संचालक मंडळ राजकारण विरहित असून बँकेच्या कामकाजात समाजाप्रती असलेला सेवाभाव त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. RBI नियमानुसार नफ्यातील एक टक्का रक्कम विविध सामाजिक उपक्रमासाठी देणे, दरवर्षी समाज मित्र, सहकार मित्र असे पुरस्कार बँक देते. आपली बँक सुरवातीपासून सतत अ ऑडिट वर्गात आहे. व्यवसाय वृद्धी बरोबरच नफ्यात समाधानकारक वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
उपस्थित सभासद व ग्राहक यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उदय पेंडसे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येनेे सभासद उपस्थित होते.