"सभासद-ग्राहकांना विश्वासात घेण्याचा डोंबिवली बँकेचा चांगला उपक्रम...'' सौ. सुवर्णाताई जोशी.

    

SuvarnaJoshi_1   
कर्जत - "डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सभासद-ग्राहकांना विश्वासात घेउन, बँकेच्या विविध योजनांची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्राविषयी अवगत केले, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे." असे गौरवोद्गार कर्जत नगरपालिकेच्या मा. अध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांनी येथे काढले. बँकेच्या कर्जत शाखेने योजलेल्या सभासद-ग्राहक मेळाव्यात त्या बोलत होत्या.
 
" महिलांसाठी व्याजदरात सवलत देउन, महिलांना स्वत:च्या नावाने घर घेण्याचा, स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे." ऑन लाईन कर भरण्याची सुविधा सुरू करण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न आहे. त्यासाठी बँकेचा प्रस्ताव आल्यास, त्याचा नक्की विचार करू." असेही त्यांनी आवर्जून सांगितले व बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

Img2_1  H x W:
 
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, बँकेची सामाजिक बांधिलकी, संचालकांचे योगदान याबाबत माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
 
बँकेचे मा. संचालक श्री विजय शेलार यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती सांगितली. सद्य स्थितीतील मंदीचे वातावरण, रिझर्व्ह बँकेचे धोरण, सहकारी बँकींग क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन याबद्दल सविस्तर विवेचन त्यांनी केले.
 
कर्जत शाखेचे मा. पालक संचालक श्री. योगेश वाळूंजकर यांनी बँकेची तांत्रिक सुरक्षितता, सायबर सिक्युरिटी याबाबत माहिती सांगितली. त्याचप्रमाणे भविष्यकाळात सुरू करण्यात येणा-या विविध योजनांचा उहापोह केला. तसेच नेट-बँकींग, मोबाईल बँकींगचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीही मार्गदर्शन केले.
 
 
karjat1_1  H x
 
karjat2_1  H x
 
karjat3_1  H x
 
बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती बँकेच्या मुख्य व्यवस्थापक सौ. संगिता देशपांडे यांनी दिली. तसेच बँकेच्या भागधारक कल्याण निधीची व त्याच्या विविध उपक्रमांबाबतही माहिती सांगितली.
 
याप्रसंगी उपस्थित ग्राहकांनी उपयुक्त सूचना केल्या व शाखेच्या सेवेबद्दल चांगले अभिप्राय व्यक्त केले. या मेळाव्यास मा. संचालक श्री. मिलिंद कोपरकर उपस्थित होते. तसेच शाखाव्यवस्थापक सौ. सुजाता म्हस्के व्यासपीठावर उपस्थित होत्या.
 
मेळाव्याचे सूत्रसंचालन उदय पेंडसे यांनी केले. मेळाव्यास सभासद ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात ज्येष्ठ संचालक कोपरकर यांच्या हस्ते सुवर्णाताई जोशींचा पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला.