सांगली येथे ग्राहक/सभासद मेळावा

    
|
 
sangli_1  H x W
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सांगली शाखेचा सभासद/ग्राहक मेळावा शनिवार दिनांक १फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता सांगली येथील वेलणकर मंगल कार्यालय, राममंदिर रोड येथे होणार आहे. डोंबिवली बँक सांगली शहरात गेली सुमारे ९ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सदर कार्यक्रमासाठी बँकेचे मा. संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सभासद व ग्राहकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.