इचलकरंजी शाखेचा ग्राहक/सभासद/हितचिंतक मेळावा

30 Jan 2020 17:45:55

echal_1  H x W:
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेचा सभासद/ग्राहक/हितचिंतक मेळावा शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता इचलकरंजी येथील सिंधीपंचायती धर्मशाळा, शाहू पुतळ्याजवळ, कोल्हापूर रोड येथे होणार आहे. डोंबिवली बँक इचलकरंजी शहरात गेली सुमारे १२ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सदर कार्यक्रमासाठी बँकेचे मा. संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सभासद व ग्राहकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0