हाऊसिंग सोसायट्यांसाठी डोंबिवली बँकेचे बहुपयोगी असे नाविन्यपूर्ण अॅप कार्यान्वीत

    
|

society_1  H x
 
 
डोंबिवली नागरी सहकारी (डीएनएस) बँकेने सहकारी हाऊसिंग सोसायट्यांसाठी, त्यांच्या दैनंदिन तसेच हिशेबाच्या कामांसाठी उपयुक्त ठरेल असे परिपूर्ण अॅप विकसित केले आहे. ज्या सहकारी हाऊसिंग सोसायट्यांचे खाते डोंबिवली बँकेत आहे, त्या सोसायट्यांना व त्यांच्या सभासदांना, बँकेच्या वतीने हे अॅप विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हाऊसिंग सोसायटीच्या एखाद्या सभासदाचे खाते, डोंबिवली बँकेत नसेल तरी देखील, त्याला देखील सोसायटीची बिल्स या अॅपद्वारे अदा करणे सहज शक्य होणार आहे हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे.
 
कार्यकारिणीच्या मासिक सभा व त्यांचे इतिवृत्त, वार्षिक सभांची सूचना व इतिवृत्त, सभासदांच्या तक्रारी, तक्रारींचे निवारण, जमा खर्च तसेच अन्य हिशेब पत्रके, वाहन पार्कींग माहिती इ. अनेक उपयुक्त बाबींचा समावेश या अॅपमध्ये केला आहे.
 
शनिवार दि. २५ जानेवारी रोजी डोंबिवलीतील सर्व ११ शाखांचे सभासद-ग्राहक मेळावे एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या संख्येत व उत्साहात संपन्न झाले. या मेळाव्यांमध्ये डीएनएस बँकेची तसेच सहकारी बँकिंग क्षेत्राची माहिती, डीएनएस बँकेच्या आकर्षक कर्ज व ठेव योजनांची माहिती देण्यात आली. या मेळाव्यांमध्येच सदर 'डी.एन्.एस्.सोसायटी' या अॅपचे अनावरणही करण्यात आले.
 
हे अॅप डाउनलोड करून घेण्यासाठी सर्व सोसायट्यांनी डीएनएस बँकेच्या शाखांशी जरूर संपर्क साधावा असे आवाहन या प्रसंगी सर्वांना करण्यात आले आहे.