नाशिक शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

    
|
 
Warjurkar_1  H
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नाशिक शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक नाशिक शहरात गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
Sule_1  H x W:
मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे , मा. संचालक श्री. वाळूंजकर यांनी संबोधन केले. उपसरव्यवस्थापक श्री. सुळे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.
 
Audience_1  H x
 
याच दिवशी eye check-up camp ही योजला होता. या कँपलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.