डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या निवेदिता सावळेंची सर्वत्र प्रशंसा

    
|
'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या निवेदिता सावळेंची सर्वत्र प्रशंसा
 
कोल्हापूर: 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या कोल्हापूर शाखेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या निवेदिता सावळे यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावर पडलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण बनावट समजून अनेकांनी दुर्लक्ष केले. पण निवेदिता सावळे यांनी ते गंठण उचलून पडताळणी केली आणि ते चक्क सोन्याचे गंठण निघाले. हे सापडलेले गंठण निवेदिता सावळे यांनी प्रामाणिकपणाने पोलिस ठाण्यात जमा केले आणि 'अर्थाला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे' हे 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'चे ब्रीदवाक्य सार्थ केले. या घटनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.