रक्तदान शिबिराचे आयोजन

    
|

                          रक्तदान शिबिराचे आयोजन

 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नेहरू मैदान परिसर शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.'वामनराव ओक' रक्तपेढी, ठाणे यांच्या सहकार्याने होणारे हे शिबीर रविवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत बँकेची नेहरू मैदान परिसर शाखा,अरुणा सभागृह,सावरकर रोड, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी खुले असून; सगळ्या दानांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान मानले गेले असल्याने या शिबिरात अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ८८७९८३२२४३/०२५१-२४४५४५४