जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेमार्फतआगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेमार्फत

आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन

 

डोंबिवली – डोंबिवली नागरी सहकारी बँकेमार्फत जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कलांजली, पुणे या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्य गाथेवर आधारिक नाट्यवर्य कुसुमाग्रज लिखित ``वीज म्हणाली धरतीला’’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 अत्यंत प्रभावी व स्तिमीत करणा-या या कार्यक्रमामुळे अनेकांना इतिहासाची नव्याने जाणीव झाली त्याचप्रमाणे झाशीच्या राणीचे केवळ शौर्याचेच नव्हे तर त्यांच्या भाव-जीवनातील विविध प्रसंग उलगडले गेले. या कार्यक्रमाचे सादरीकरण अंजली लाळे, वैशाली कणसकर, डॉ.वृषाली देहडराय व संज्ञा कुलकर्णी यांनी केले. या चौघीही जणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

 बँक मागील सात वर्षांपासून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करते. कार्यक्रमाचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेच्या मा. उपाध्यक्षा सौ. कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी बँकेविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात सौ. कृतिका केतकर यांनी स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नम्रता सावंत यांनी केले. 

 कार्यक्रमास महिला ग्राहक व सभादांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच महिला दिनानिमित्त आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले.

 
© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web