Ghodbunder Rd Branch

DNS Bank    15-Mar-2019

 

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या घोडबंदर रोड शाखेतर्फे मान्यवर महिलांचा सत्कार


डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या घोडबंदर रोड शाखेतर्फे महिला दिनानिमित्त ठाण्यामधील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे , नगरसेविका सौ. पद्मा भगत, उद्योजिका दिपाली देशमुख, डॉक्टर मंजिरी, श्रीमती मडकीकर [सचिव - श्री सत्यश्री सोसायटी], शिल्पा गायकवाड [इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट मॅनेजर] अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर महिलांचा, बँकेच्या घोडबंदर रोड शाखा व्यवस्थापक सौ. शिल्पा देशपांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी ठेवीदारांच्या प्रतिनिधी म्हणून सौ. कुलकर्णी आणि सौ. ईनामदार यांचाही सत्कार करण्यात आला.