डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे मान्यवर महिलांचा सत्कार
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिनानिमित्त रत्नागिरीमधील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यावेळी श्रीमती जाधव - रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक, ॲड . लोवलेकर, प्राध्यापक सीमा कदम - पीएचडी (जोगळेकर कॉलेज ), श्रीमती जोशी - उपमुख्याध्यापिका, जागुष्टे विद्यालय, श्रीमती भोंगले- स्थानिक समाजसेविका, श्रीमती दामले - आंबा व्यावसायिक, श्रीमती शिंदे - उद्योजिका, श्रीमती प्रतिमा राणे - [एच.आर.], श्रीमती रहाटे - स्थानिक बचतगटाच्या प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर महिलांचा, बँकेच्या रत्नागिरी शाखा व्यवस्थापक श्री.प्रकाश खाडिलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शहर पोलीस निरीक्षक श्रीमती जाधव यांनी, सायबर फ्रॉडपासून महिलांनी सावध राहावे असे आवाहन केले.