shahad consumer meet

DNS Bank    27-Feb-2019

                         शहाड शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

शहाड शाखेचा ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. शाखा व्यवस्थापक सुनीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.  माननीय संचालक मिलिंद कोपरकर यांनी यावेळी बँकेच्या सामाजिक सहभागाविषयी माहिती दिली. तर मुख्य व्यवस्थापक सुनीता शशांकन यांनी बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांविषयी व विविध उपक्रमांविषयीची माहिती ग्राहकांना दिली. तसेच आयुर्विमा आणि आरोग्यविम्याविषयी माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली. मुख्य व्यवस्थापक संगीता देशपांडे यांनी उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले व मेळाव्याचा समारोप केला. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद या मेळाव्यास मिळाला.