Ghodbunder Customer Meet Post Event News

DNS Bank    22-Feb-2019

                       घोडबंदर शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न  

घोडबंदर शाखेचा ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक शिल्पा देशपांडे यांनी कर्ज योजनांविषयी विस्तृतपणे माहिती ग्राहकांना दिली. तसेच व्यवस्थापक बीना सायगांवकर यांनी बँकेच्या विविध उपक्रमांविषयीची माहिती  उपस्थितांना दिली. 'एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स ' तसेच 'कोटक लाईफ इन्शुरन्स'च्या प्रतिनिधींनी 'जीवन विमा' संदर्भातील माहिती दिली. तसेच 'फिनस्किल टीम'च्या प्रतिनिधींनी 'आर्थिक साक्षरता' या विषयावर ग्राहकांना मार्गदर्शन केले. यावेळी बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री. विद्यासागर नामजोशी यांनी उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले. या मेळाव्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.