कोथरूड - पुणे येथील सभासद-ग्राहक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद

    
|


Purva_1  H x W:
 
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कोथरूड - पुणे, या पुण्यातील पहिल्या शाखेच्या सभासद व ग्राहकांचा मेळावा बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मा. पालक संचालिका सौ.पूर्वा पेंढारकर यांनी केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, बँकेची सामाजिक बांधिलकी, संचालकांचे योगदान, तसेच विविध उपक्रम याबाबत माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
 
 
 
 
 
 
  
Uday_1  H x W:
 
 
 
बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती सांगितली. सद्य स्थितीतील मंदीचे वातावरण, रिझर्व्ह बँकेचे धोरण, सहकारी बँकींग क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन याबद्दल सविस्तर विवेचन त्यांनी केले. त्याचप्रमाणे बँकेच्या व्यवसाय वृध्दीत चांगले कर्जदार मिळवून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
 
 
 
 
 
 
 
Milind1_1  H x
  
 
 
बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री. राजेश शेटे यांनी दिली. तसेच बँकेच्या भागधारक कल्याण निधीची व त्याच्या विविध उपक्रमांबाबत मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी माहिती दिली.
 
बँकेने अंगिकारलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेविषयी घेत असलेली काळजी तसेच रुपे डेबिट कार्ड,यू पी आय, डू - मोबाईल ऍप आदी सुविधांविषयी माहिती दिली.
 
 
 
 
सर्वश्री रहाळकर, सरपोतदार, शहासने, भागवत, मेहेंदळे. 'जक्राया शुगर'चे मा.अध्यक्ष श्री. जाधव, 'ईशा सोलर'चे श्री. केळकर आदी ग्राहक - सभासदांनी उपयुक्त सूचना केल्या तसेच आपले अनुभव सांगितले. आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक श्री. महेंद्र कोथळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पेंडसे यांनी केले. मेळाव्यास ग्राहक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Audience1_1  H
 

aud1_1  H x W: