डोंबिवली बँकेच्या पनवेल शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर.

    

panvel_1  H x W 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या पनवेल शाखेचा, मा. संचालक सर्वश्री मिलिंद आरोलकर, मिलिंद कोपरकर व विजय शेलार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून नवीन वास्तूत शुभारंभ करण्यात आला.
 
panvel5_2  H x
panvel5_1  H x
 
नवीन वास्तुतील शाखा शुभारंभानिमित्त सभासद व ग्राहक मेळावा योजण्यात आला होता. मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, संचालकांची भूमिका, बँकेच्या सेवेची वैशिष्ट्ये याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.

panvel3_1  H x  
 
बँकेच्या आर्थिक स्थितीविषयीची माहिती मा. संचालक सी.ए. श्री. विजय शेलार यांनी दिली. तर बँकेच्या विविध योजनांविषयीची माहिती सहाय्यक सरव्यवस्थापक सौ. सुनीता पाटील यांनी दिली. सभासद कल्याण निधी विषयीची माहिती श्री. उदय पेंडसे यांनी दिली.
 
panvel2_1  H x
मेळाव्यास अनेक सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच ग्राहक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थिती होते.