पनवेल शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर

13 Dec 2019 17:35:04

 
पनवेल शाखेचे नवीन वास्तूत
 
 
डोंबिवली नागरी सहकारी बँक पनवेल शहरात सुमारे १० वर्षे कार्यरत आहे. बँकेची पनवेल शाखा आता आधुनिक सोयी - सुविधांनी युक्त [ए टी एम / ई लॉबी सह] सहस्रबुद्धे हाऊस, तळमजला, टिळक पथ, पनवेल येथील नवीन वास्तूत स्थलांतरित होत आहे. या नवीन वास्तूतील कामकाज प्रारंभ दि. १६ डिसेंबर,२०१९ पासून होणार आहे. त्यानिमित्त बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने शाखेच्या सभासद /ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता तथास्तु हॉल,नील समृद्धी अपार्टमेंट, टिळक पथ, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी बँकेचे मा. संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सभासद व ग्राहकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0