कल्याण शाखेतर्फे 'शारदा मंदिर' विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

    
|
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कल्याण शाखेतर्फे 'शारदा मंदिर' विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. चित्रकला स्पर्धेबरोबरच यावेळी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील दैनंदिन व्यवहारांविषयी तसेच गुंतवणूक योजनांविषयी माहिती देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.