डीएनएस बँक आयोजित घरगुती गणपती आरास/ सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .

    
|
घरी येणाऱ्या गणपती बाप्पासाठी सुंदर, आकर्षक आरास/सजावट करणे हा प्रत्येक गणेशभक्ताचा आवडीचा विषय. भक्तांच्या याच कलेला प्रोत्साहन देण्यासाठी डीएनएस बँकेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने घरगुती गणपती आरास/ सजावट स्पर्धा आयोजित केली जाते. दर वर्षी त्याला मिळणारा प्रतिसाद हा द्विगुणीतच होतो. खास बँकेच्या ग्राहकांसाठी असणाऱ्या या स्पर्धेला यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत.
 
 
 
 
 
चेतन वनगे - डोंबिवली यांना प्रथम पारितोषिक मिळाले असून अन्य विजेत्यांमध्ये पुण्याहून शैलेंद्र आपटे, बदलापूरहुन निलेश घांग्रेकर व दिगंबर पाटील , अंबरनाथमधून सुनीता पाताडे आणि ठाकुर्लीहून संजय कारंडे यांचा समावेश आहे.
 
एका छोटेखानी समारंभात विजेत्यांना मा. संचालिका सौ. पूर्वा पेंढरकर व सौ. मेघना आंबेकर यांच्या हस्ते, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
 
विजेत्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व बँकेचे आभार मानले.