कृतज्ञता दिन समारंभ संपन्न

    
|

 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा कृतज्ञता दिन समारंभ नुकताच संपन्न झाला. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गुणवंत कर्मचारी पाल्यांचा तसेच बँकेतील सेवेची २५ वर्षे पूर्ण झालेल्या एकूण १४ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजारामपुरी [कोल्हापूर] शाखेच्या निवेदिता सावळे व अंबरनाथ एम.आय.डी.सी. शाखेचे संजय पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 
 
दातारबंधू पुरस्कृत उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार अंबरनाथ एम.आय.डी.सी.शाखेच्या व्यवस्थापक कश्मिरा चव्हाण आणि औरंगाबाद शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक मनीष लोखंडे यांना देण्यात आला. तसेच कै. अरविंदराव मराठे स्मृती पुरस्कार पुणे कोथरूड शाखेच्या व्यवस्थापक अंजली देशपांडे आणि कै. उदय बेहेरे स्मृती पुरस्कार रांजणोली शाखा व्यवस्थापक सचिन चोलूरवाल यांना प्रदान करण्यात आला. तर मे.युनिकॅट इंडस्ट्रीज प्रा.लि पुरस्कृत उत्कृष्ट ग्राहकसेवा पुरस्कार कुळगाव शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक दीपक गांगोडे यांना प्राप्त झाला. आदर्श शाखा व्यवस्थापक हा पुरस्कार पुणे शाखेचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र कोथळे आणि ठाकुर्ली - कल्याण रोड शाखेच्या व्यवस्थापक प्रियांका बागवे यांना देण्यात आला.
 
 
उत्कृष्ट शाखा पुरस्काराने मोठ्या शाखांमधून पुणे [कोथरूड] शाखा आणि लहान शाखांमधून ठाकुर्ली - कल्याण रोड शाखा, सिंहगड रोड शाखा आणि विक्रमगड शाखा यांना सन्मानित करण्यात आले.