''देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांची जाणीव ठेवणे गरजेचे''. - डॉ. सुनील पुणतांबेकर

DNS Bank    30-Jan-2019

                               ''देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांची जाणीव ठेवणे गरजेचे''. -  डॉ. सुनील पुणतांबेकर

 

डोंबिवली -  ''देशाच्या सीमेवर ऊन -पाऊस -थंडी -वारा याची पर्वा न करता, आपले , देशबांधवांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कष्टाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी केवळ लढाईवरच जायला हवे असे नव्हे , तर आपल्या दैनंदिन व्यवहारात,जीवनात नियमांचे व कर्तव्याचे पालन करायचा निश्चय केला तरी ती देशसेवा होऊ शकते." असे प्रतिपादन सुप्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ.सुनील पुणतांबेकर यांनी ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

            ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या ध्वजारोहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजारोहण केल्यानंतर डॉ.सुनील पुणतांबेकर बोलत होते. "जीवनात यशस्वी होण्यासाठी अर्थव्यवहाराचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. आणि ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’ने अनेकांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य देऊ केले आहे हे विशेष कौतुकास्पद आहे.”   ''प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक गोष्टीत स्वतःला अद्ययावत ठेवणे व दुसऱ्या व्यक्तीबद्दल आदर ठेवणे या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल" असेही त्यांनी याप्रांसगी सांगितले.   

      संरक्षणविषयक संस्थांच्या परीक्षणाचे अनुभवही त्यांनी याप्रसंगी कथित केले. कार्यक्रमात ठेवी, कर्जे तसेच बँक अशुरन्सची उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या शाखांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे २०१८ या वर्षात कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांचाही पदक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

        कार्यक्रमाचे समयोचित प्रास्ताविक मा.उपाध्यक्षा सौ. नंदिनी कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी करून दिला. सौ. मधुरा देशमुख यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमास मा. संचालक तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.