'डोंबिवली नागरी सहकारी बँके'स 'सत्यवेध फाउंडेशन'चा पुरस्कार

          'डोंबिवली नागरी सहकारी बँके'स 'सत्यवेध फाउंडेशन'चा पुरस्कार 

सांगली: बँकिंग सेवेतील भरीव योगदानाबद्दल नुकताच 'सत्यवेध फाउंडेशन'तर्फे,  'डोंबिवली नागरी सहकारी बँकेस' पुरस्कार देण्यात आला. सांगली येथील टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक सरव्यस्थापक श्री. पराग नवरे आणि श्री. संजय कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक, सांगली यांनी बँकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा देखील सत्कार करण्यात आला.

 

Award

© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web