Ahmadnagar Consumers Seminar

DNS Bank    23-Jan-2019
                                                                       अहमदनगर शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न 
 
अहमदनगर शाखेचा ग्राहक मेळावा नुकताच, दीक्षित मंगल कार्यालय दिल्लीगेट,अहमदनगर येथे संपन्न झाला. यावेळी मा.संचालक श्री. मिलिंद कोपरकर यांनी बँकेच्या सामाजिक सहभागाविषयी माहिती दिली.सहाय्यक सरव्यस्थापक श्री. पराग नवरे यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी विस्तृतपणे माहिती उपस्थितांना दिली. शाखा व्यवस्थापक श्री. विनायक करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. प्रफुल्ल निमदेव [E.S. D]  यांनी ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी  'एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स'च्या प्रतिनिधींनी  'जीवन विमा' व 'रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स'च्या प्रतिनिधींनी, 'आरोग्य विमा' संदर्भातील माहिती दिली. या मेळाव्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.