'डोंबिवली नागरी सहकारी बँके' चा उद्योजक मेळावा संपन्न

'डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा उद्योजक मेळावा संपन्न 

 

'डोंबिवली नागरी सहकारी बँके'तर्फे औरंगाबाद येथे नुकताच उद्योजक मेळावा संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक राम भोगले,विवेक देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उद्योजक तसेच लघु उद्योजक व चार्टड अकाऊंटंटस मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सरव्यवस्थापक श्री. गोपाळ परांजपे व  उपसरव्यवस्थापक सर्वश्री नितीन सुळे आणि राजेश शेटे यांनी 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या, उद्योजकांसाठी उपयुक्त अशा कर्ज योजनांबरोबरच 'रिटेल लोन', 'एस बी गोल्ड'सह विविध ठेव योजनांची माहिती उपस्थितांना दिली. विशेषतः ' मायनस २' या 'टेकओव्हर' कर्ज योजनेची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या शंकांचे समाधान केले. या मेळाव्यास माननीय संचालक सर्वश्री. सी. ए. जयंत पित्रे,मिलिंद कोपरकर व सी.ए.विजय शेलार उपस्थित होते. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी व सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 


 

© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web