Car Carnival Goregaon-Huge Response

DNS Bank    16-Jan-2019

डोंबिवली नागरी सहकारी बँकआयोजितकार कार्निवलला उदंड प्रतिसाद 

 

‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्यावतीने आयोजित 'कार कार्निवल'ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या ‘कार कार्निवल’चे आयोजन दि. १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत आझाद मैदान, महात्मा गांधी पथ,मोतीलाल नगर २,गोरेगाव [पश्चिम] येथे  करण्यात आले होते.  अनेक ग्राहकांनी गाड्यांचे तात्काळ 'बुकिंग' देखील केले.  या ‘कार कार्निवल’मध्ये 'मारुती नेक्सा', 'मारुती', 'रेनॉ','होंडा' अशा विविध ब्रँड्सच्या चारचाकी ९.४५% आणि ''रॉयल एनफिल्ड', 'बजाज', 'यामाहा','सुझूकी', 'टीव्हीएस' अशा नामवंत ब्रॅण्ड्सच्या दुचाकी ९.२०% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध होत्या.या कार्निवल दरम्यान तात्काळ कर्जमंजुरी करण्यात आली आणि  प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ होते. तसेच महिलांसाठी व्याजदरात विशेष सवलत देण्यात आली होती.. याशिवाय बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली.