डोंबिवली बँकेच्या 68 व्या शाखेचा शुभारंभ बावधन (पुणे) येथे

DNS Bank    13-Jul-2018

डोंबिवली बँकेच्या 68 व्या शाखेचा शुभारंभ बावधन (पुणे) येथे

 

डोंबिवली – डोंबिवली नागरी सहकारी बँकेची 68 वी शाखा बावधन (पुणे) येथे रविवार दि. 15 जुलै, 2018रोजी कार्यान्वित होत आहे. या शाखेमध्ये ई – लॉबीची सुविधा उपलब्ध केली असून त्यामुळे ग्राहकांनादिवसभरात कधीही पैसे काढणे,, चेक भरणे त्याचप्रमाणे आपल्या खात्याचे 

पासबुक अद्ययावत करतायेणार आहे.पुणे शहरात बँकेच्या कोथरूड, सिंहगड रोड व मारूंजी येथे शाखा कार्यरत आहेत. बावधन (पुणे) येथे पुण्यातील चौथी शाखा कार्यान्वित होणार आहे.

 बँकेने मिश्र व्यवसायाचा 7700 कोटींचा टप्पा ओलांडला असून लवकरच खोणी – तळोजा रोड, येथेही शाखेचा शुभारंभ होणार आहे. 

 बँकेची बावधन शाखा बिझनेस स्क्वेअर, सूर्या दत्त कॉलेजजवळ, रानवारा कॉम्प्लेक्सच्या समोर,बावधन येथे कार्यान्वित होत आहे. बँकेच्या विविध आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठीया शाखेला अवश्य भेट द्यावी असे आवाहन 

मा. अध्यक्ष श्री. कर्वे व सरव्यवथापक श्री. परांजपे यांनी याप्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.