Press Note

पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे उद्दिष्टय साध्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ,ठाणे ही पर्यावरण रक्षणाचे काम करणारी संस्था असून टिटवाळ्याजवळ रूंदे या गावात देवराई प्रकल्प उभारण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पामध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँक परिवाराने सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.

 

सदर उपक्रमाची माहिती देण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गणेश मंदिर संस्थान व डोंबिवली नागरी सहकारी बँक सहआयोजक म्हणून सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. 9 जून 2018 रोजी वक्रतुंड हॉल, गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास पर्यावरण स्नेही नागरिकांनी अवश्य उपस्थित राहून या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

 


© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web