डी.एन. एस. बँकेची ३२ वी ई – लॉबी कार्यान्वित


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

डी.एन. एस. बँकेची ३२ वी  लॉबी कार्यान्वित

डोंबिवली दि. ७ एप्रिल – डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या औद्योगिक परिसर शाखेत, ग्राहकांच्या सोयीसाठी ई-लॉबी कार्यान्वित करण्यात आली. बँकेच्या एकूण ६५ शाखा असून त्यापैकी, आता  ३२ शाखांमध्ये ई-लॉबी कार्यरत आहेत. डोंबिवलीमध्ये बँकेच्या ६ शाखांच्या ठिकाणी ई-लॉबी कार्यरत आहे. त्यामध्ये आता अजून एका ठिकाणाची भर पडली आहे.

डोंबिवली बँकेने नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आणि ग्राहक सेवेला प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले आहे. ई-लॉबीमुळे ग्राहकांना, दिवसभरात कधीही, डोंबिवली बँकेच्या कोणत्याही शाखेच्या खात्यात रोख रक्कम भरणे, चेक भरणे शक्य होणार आहे. तसेच आपले पासबुक अद्ययावत करता येणार आहे. तरी ग्राहकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web