डोंबिवली नागरी सहकारी बँक आता भीम (BHIM) अ‍ॅपवर ...

DNS Bank    21-Apr-2018

 


डोंबिवली नागरी सहकारी बँक आता भीम (BHIM) अ‍ॅपवर ...

डोंबिवली - आपल्या ग्राहकाभिमुख बँकिंग सेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत डोंबिवली नागरी सहकारी बँक आता यू.पी.आय्. तसेच भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅपवर  दाखल झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या यू.पी.आय्. तसेच भीम या अ‍ॅपवर डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा समावेश झाला आहे. आता डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे ग्राहक आपला खाते क्रमांक भीम तसेच यूपीआय अ‍ॅपशी जोडून आपल्या खात्याचे व्यवहार करू शकतील.

यामुळे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्यावरून कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे पाठविणे तसेच पैसे  खात्यावर जमा करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे भीम व युपीआय अ‍ॅपद्वारे व्यावसायिक तसेच सरकारी आस्थापनांना बिलांची रक्कम (उदा. लाईट बील, लॅडलाईन बील, मोबाईल बील, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, गॅस बील) अदा करता येणार आहेत.

गुगल प्ले स्टोअरवर भीम अ‍ॅप उपलब्ध असून, ग्राहकांनी आपल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर हे अ‍ॅप डाऊनलोड करावे व आपला खाते क्रमांक त्याच्याशी संलग्न करावा असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले.

How to use BHIM APP