डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-

DNS Bank    18-Apr-2018

डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-


 

 कल्याण – दि. 18 एप्रिल – अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या आधारवाडी - कल्याण शाखेचा आज शुभारंभ करण्यात आला. बँकेची ही 66 वी शाखा असून कल्याण शहरातील 2 री शाखा आहे.

 बँकेचा मा. संचालक श्री. जयंत पित्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे मा. संचालक सर्वश्री विजय शेलार, पुरुषोत्तम कुंदेन, सरव्यवस्थापक श्री. परांजपे तसेच माजी संचालक सर्वश्री मधुकरराव चक्रदेव व अच्युतराव क-हाडकर उपस्थित होते.

 कल्याण जनता सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष अ‍ॅड. श्री. सुरेशराव पटवर्धन, मा. संचालक श्री. वसंतराव काणे तसेच  मा. आमदार श्री. नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक श्री. उमेश बोरगावकर यांनी शाखेस भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

View more photos