डोंबिवली बँकेच्या वार्षिक अहवालास सहकार सुगंध चा उत्कृष्ट अहवाल पुरस्कार

DNS Bank    27-Mar-2018

सहकार भारती व सहकार सुगंधच्या वतीने नागरी सहकारी बँकांसाठी प्रतिवर्षी उत्कृष्ट वार्षिक अहवाल स्पर्धा योजण्यात येते. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी डोंबिवली नागरी सहकारी बंकेला या स्पर्धेत कोकण विभागातून प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.


सोलापूर येथे  झालेल्या भव्य समारंभात मा. सहकार मंत्री नामदार श्री. सुभाषबापू देशमुख यांच्या शुभ हस्ते  बँकेचे मा. संचालक  सर्वश्री शिवाजीराव पाटील, मिलिंदजी आरोलकर व सौ. पूर्वा पेंढरकर यांनी पारितोषिक स्वीकारले .

या सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागात सहकार क्षेत्रात काम करणार्‍या संस्था-संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.