Angaon - New Branch Opened

DNS Bank    10-Oct-2018

डोंबिवली बँकेच्या अनगांव शाखेचा शुभारंभ 

डोंबिवली –  डोंबिवली नागरी सहकारी बँकेची भिवंडी वाडा रोडवरील अनगांव शाखा मंगळवार दि. 16 ऑक्टोबर 2018 रोजी कार्यान्वित होत आहे. यामुळे बँकेच्या शाखांची संख्या 69 होणार आहे. या शाखेच्या शुभारंभानिमित्त बँकेने गणेश पूजन आयोजित केले आहे.  

 बँकेने मिश्र व्यवसायाचा 7700  कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेने 360 दिवसांकरीता विशेष ठेव योजना कार्यान्वित केली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 8.25% व सर्वसाधारण नागरिकांसाठी 8% व्याज देण्यात येणार आहे.

 बँकेची अनगांव शाखा धवानी कॉम्प्लेक्स, अनगांव नाका, भिवंडी वाडा रोड, अनगांव येथे कार्यान्वित होणार आहे. बँकेच्या विविध आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी या शाखेला अवश्य भेट द्यावी असे आवाहन मा. अध्यक्ष श्री. कर्वे व सरव्यवथापक श्री. परांजपे यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.