डोंबिवली बँकेला वृध्दींगत नफा

    
|

डोंबिवली बँकेला वृध्दींगत नफा

 

2020-21 हे वर्ष आर्थिक क्षेत्रासाठी खडतर होतं. या आव्हानात्मक कालखंडातही डोंबिवली बँकेने आपली नफाक्षमता कायम राखत गतवर्षीपेक्षा अधिक नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी लाभांश देण्यासाठी सहकारी बँकांना परवानगी दिली असल्याने, सदर नफ्याच्या वितरणातून सभासदांना लाभांश देणेही शक्य होणार आहे.

 

व्याजदरांवर वेळोवेळी ठेवलेले नियंत्रण, गुंतवणूकीबाबत घेतलेले समयोचित योग्य निर्णय, तसेच निर्लेखित कर्ज खात्यांमधील विक्रमी वसुली इत्यादींमुळे बँकेला मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीपेक्षा अधिक नफा मिळविण्यात यश मिळाले आहे. बँकेतील अधिकारी, कर्मचारी अन्यही सर्व संबंधित मंडळींनी केलेल्या उत्तम सहकार्यामुळे हे साध्य झाले आहे.

 

बँकेच्या अलेखापरिक्षित हिशोबपत्रकांनुसार 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या ठेवी 4,064/- कोटी, कर्जे 2,323/- कोटी, गुंतवणूका 1,313/- कोटी, भांडवल 146 /- कोटी असून बँकेची भांडवल पर्याप्तता 13% हून अधिक एवढी समाधानकारक आहे. तसेच बँकेचा ढोबळ नफा 125/- कोटी असून, इतर सर्व खर्च तरतूदी वजा जाता निव्वळ नफा सुमारे 39/- कोटी आहे.

 

बँकेने ‘‘डीएन्एस् पे’’ अ‍ॅप विकसित केले आहे. ही सेवा नि:शुल्क आहे. या अ‍ॅपमुळे सर्व प्रकारची युपीआय् पेमेंटस्, अन्य बँकांमधील खात्यांचे व्यवहार, क्यु.आर.कोड स्कॅन करून रक्कम अदा करणे इत्यादी सहजशक्य झाले आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या खात्याचे क्यु. आर.कोड देखील देण्यास सुरूवात केली आहे. जेणेकरून कोणत्याही पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे स्वीकारता येणार आहेत.

 
 

-@@@@@-