डोंबिवली बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

    
|
 
dns1_1  H x W:
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . प्रारंभी बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ठेवी व कर्ज व्यवहार या पारंपारीक व्यवसायाबरोबरच अन्य उत्पन्नाचे मार्गही चोखाळणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच बँकेचे सर्व डिलीव्हरी चॅनल्सचा तसेच अॅपचा वापर आपण आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमात, डिसेंबर, २०१९ अखेर ठेवी तसेच कर्जांची उद्दिष्टे पूर्ण करणा-या, जास्तीत जास्त पॉस मशिनस् व क्यु.आर्.कोड वितरीत करणा-या शाखांचा गौरव करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात आजारपणाची रजा न घेतलेल्या १४ कर्मचा-यांचाही पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला. तसेच, या वर्षी विजयी ठरलेल्या क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला.

dns2_1  H x W:   
प्रजासत्ताक दिनानिमित्त योजलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून टी जे एस् बी सहकारी बँकेचे मा. उपाध्यक्ष शरदराव गांगल उपस्थित होते. प्रमुख पाहूण्यांचा परिचय मा. संचालक महेश फणसे यांनी करून दिला. यावेळी मा. उपाध्यक्षा सौ. नंदिनी कुलकर्णी व सरव्यवस्थापक परांजपे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पियुषा देशपांडे यांनी केले.
 
dns3_1  H x W:
 
यावेळी श्री.गांगल यांनी "आधूनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल घडत आहेत. इलेक्ट्रीक कार मुळे, बाईक मुळे वाहन उद्योगात अमुलाग्र बदल होत आहेत, होणार आहेत. बँकींग क्षेत्रही याला अपवाद नाही. तेव्हा या आव्हानांना सामोरे जाण्याची सिध्दता आपण ठेवली पाहिजे," असे प्रतिपादन केले. " समाजातील गरजू व्यक्तींसाठी, दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी आपल्या सारख्या सहकारी बँकांची स्थापना झाली आहे. आपल्या सहकारी बँकांना सामाजिक चळवळीचे अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचे बदल आपण सहज आत्मसात करू शकतो याची मला खात्री आहे. परंतू सहकारी बँकांचं सोशल ऑडीट सतत होत असतं, त्यामुळे आपण अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे," असेही ते म्हणाले. आधूनिक तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगात होणा-या बदलांची सोदाहरण माहिती त्यांनी याप्रसंगी सांगितली. कार्यक्रमास बँकेचे मा. संचालक मंडळ , अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.