Urban

DNS Bank    16-Mar-2019
           बँकांच्या व्यवसाय सुलभतेसाठी कायद्यात बदलाचे संकेत 
  ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सहकार विभागाचे अधिकारी आणि बँकांच्या प्रतिनिधींची समिती
 
राज्याच्या विकासात सहकारी बँकांचे योगदान मोठे असून कर्जवसुली, सायबर सुरक्षितता आणि व्यवसाय सुलभता ही या बँकांसमोरील मोठी आव्हाने आहेत. बँकांच्या सर्वच अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सरकार सक्षम असून त्यासाठी बँकांचे प्रतिनिधी आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्याची आणि सायबर सुरक्षितेसाठी राज्य सरकारतर्फे सामाईक तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'डिजिटल बँकिंगच्या सध्याच्या युगात सहकारी  बँकांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय' याबाबत ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या सहकारी बँकिंग परिषदेच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, रिझव्‍‌र्ह बँकेचे मा. संचालक सतीश मराठे उपस्थित होते. 
        या कार्यक्रमात डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी नागरी सहकारी बँकांना थकीत कर्ज वसुलीसंदर्भात येणाऱ्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या तसेच सहकारी बँकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी  राज्य सरकारने सर्व सहकारी बँकांची परिषद योजावी अशी विनंती केली.