Women's Day Programme

DNS Bank    01-Mar-2019

        जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेचा विशेष कार्यक्रम

डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त शुक्रवार दि. ८ मार्च, २०१९ रोजी सांयकाळी ६.३० वाजता सुयोग मंगल कार्यालय, टिळक पथ, डोंबिवली [पूर्व] येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कलांजली,पुणे या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्य गाथेवर आधारित नाट्यवर्य वि.वा. शिरवाडकर लिखित 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. 

          डोंबिवली नागरी सहकारी बँक ही देशातील एक अग्रगण्य मल्टी स्टेट शेड्युल्ड सहकारी बँक असून बँकेच्या, महाराष्ट्रात १५ जिल्ह्यात ६९ शाखा कार्यरत आहेत. आज रोजी बँकेने एकूण व्यवसायाचा महत्वपूर्ण असा ₹ ७७००/- कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेला स्थापनेपासून सातत्याने 'अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे.

        नियमित बँकिंगसोबत विविध सामाजिक उपक्रम बँक राबविते. त्यामध्ये जागतिक महिलादिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करणे हा ही एक उपक्रम असून डोंबिवली येथे मागील सात वर्षे बँकेद्वारा यादिवशी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी महिलांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.  

        या कार्यक्रमास सर्व महिलांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेच्या मा. उपाध्यक्षा सौ. कुलकर्णी व मा. संचालिका सौ.पेंढरकर व सौ. आंबेकर यांनी केले आहे.       

Womens Day Invite