दापोली येथे ग्राहक मेळावा

    
|
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दापोली शाखेचा सभासद/ग्राहक मेळावा शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता दापोली येथील पेन्शनर्स सभागृहात होणार आहे. डोंबिवली बँक दापोली शहरात गेली सुमारे २ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी बँकेचे मा. संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सभासद व ग्राहकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.